पायल रोहतगी म्हणते – ‘अमीषा पटेल, अबु मलिकसह इतर स्पर्धक जॉबलेस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसची एक्स स्पर्धक पायल रोहतगीने या सीजनचे स्पर्धक जॉबलेस आहेत अशी टीका केली आहे. अमीषा पटेल कोएना मित्रा, रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला यांसारख्या स्पर्धकांवर निशाणा साधला आहे आणि त्यांना जॉबलेस म्हटलं आहे.

पायलने बुधवारी ट्विट केलं होतं की, “राम राम जी. अमीषा पटेल, कोएना मित्रा, रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला आणि अबु मलिक यांच्या सर्वांकडे सध्या काहीही काम नाहीये. त्यामुळे त्यांनी पैशांसाठी बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. बाकी जे आहे ते बेमतलब आहे. ज्यांना फक्त फेमची गरज आहे. त्यामुळे ते तर फुकटच आले आहेत. मी पण जेव्हा जॉबलेस होते तेव्हा बिग बॉसमध्ये आले होते.”

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1178887989079887872

पायलचं हे ट्विट मात्र लोकांच्या पचनी पडलं नाही. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं.

पायल का यह ट्वीट लोगों को पसंद नहीं आया और वह ट्रोल हो गईं. एका युजरने म्हटलं की, यात काय डोकं नाहीये. एकाने म्हटलं, तू जॉबलेस होतीस, आताही जॉबलेस आहेस. आणखी एक युजर म्हणतो, तू जॉबलेस होतीस तेव्हा तू बिग बॉसमध्ये आली होतीस, याचा अर्थ असा नाही की, जो कोणी बिग बॉसमध्ये येतो तो जॉबलेस आहे.

पायल बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. यातील स्पर्धक राहुल महाजन सोबत रोमँस केल्याने ती नेहमीच चर्चेत असायची.

 

Visit : Policenama.com