‘बिग बॉस मराठी २’ च्या घरात कोण जाणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व लवकरच सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात महेश मांजरेकर करणार आहे. यामध्ये अनेक सहभागी कलाकारांचे नाव घेतले जात आहे. यामध्ये अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर, नृत्यांगणा सुरेखा पुणेकर, आणि यामध्ये अनेक कलाकारांचे नाव घेण्यात आले होते. पण आता यांची यादी समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने यांची यादी जाहीर केली आहे.

यामध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, कवी मनाचे ओळखले जाणारे अभिजीत बिचकुले, अभिनेता मिलिंद शिंदे, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी माटेगांवकर, अभिनेत्री अमृता देशमुख (टिकटॉक गर्ल ), अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे अशा कलाकरांची यादी चर्चेत आहे.

यामध्ये महिला किर्तनकारचाही सामावेश असणार असल्याचे समजते. पण या नेमक्या कोण ते अजून कळाले नाही. या सर्व स्पर्धकांना १४ मे रोजी बिग बॉसच्या घरात नेण्यात येणार आहे. यानंतर १७ मे ला शूटिंगला सुरुवात होणार आहे. १९ मे रोजी ‘बिग बॉस मराठी २’ पहिला एपिसोड प्रसारित होईल.

सर्वांना या एपिसोड ची उत्सकता नक्कीच लागली आहे. अनेक दिवस प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी २’च्या कार्यक्रमाची वाट पाहत होते. लवकरच त्यांची प्रतिक्षा संपणार आहे. ही प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.