अबब ! 21 मुलांची आई असलेली ‘ही’ महिला पुन्हा एकदा प्रेग्नंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील एक महिला सध्या खूप चर्चेत आहे. 44 वर्षीय हि महिला 22 व्यांदा गर्भवती असून ती 22 व्या मुलाला जन्म देणार आहे. सू रॅडफोर्ड असे या महिलेचे नाव असून तिचा पती नोएल आणि तिच्या कुटुंबाला ब्रिटनमधील सर्वात मोठे कुटुंब समजले जाते. एका युट्युब व्हिडिओद्वारे महिलेने आपल्या गर्भवती असल्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी देखील तिने एका मुलीला जन्म दिला होता.

तिने दिलेल्या माहितीनुसार, ती सध्या 15 आठवड्यांची गर्भवती असून यावेळी देखील मुलगा होईल अशी तिची अपेक्षा आहे. जर तिला यावेळेस मुलगा झाला तर तिला 11 मुली आणि 11 मुले होणार आहेत. इतक्या मोठ्या कुटुंबाचा खर्च हा पारंपरिक बेकरी व्यवसायातून चालतो. 10 खोल्यांच्या घरामध्ये हे सगळेजण राहत असून 9 व्या मुलानंतर तिने नसबंदीची शास्त्क्रिया केली होती. मात्र नंतर पुन्हा मुलं हवे असल्याने तिने शास्त्क्रिया केली. मागील वर्षीच नोव्हेंबर महिन्यात त्यांना मुलगी झाली होती.

दरम्यान, कुटुंबातील सर्वात मोठी मुले क्रिस आणि सोफी हे कुटुंबापासून वेगळे राहत असून बाकी मुले बरोबरच राहतात. सू आणि नोएल हे आजीआजोबा देखील झाले असून त्यांच्या सोफी नावाच्या मुलीला तीन मुलं आहेत.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like