बीडमध्ये भीषण अपघात एकाच कुटुंबातील 3 जण ठार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वाळू भरलेल्या टिपरच्या धडकेत एकाच कुटूंबातील तीनजण ठार झाल्याची घटना अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथे घडली आहे. काल रात्री 10 च्या सुमारास हा अपघात घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य करणारी टीम घटनास्थळी झाली होती. नागनाथ महादेव गायके, वसंत जनार्धन गायके आणि विठ्ठल मुंजाजी गायके अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

अपघातामध्ये ठार झालेले तिघेजण एकाच कुटुंबातील असून ते दुचाकीवर चालले होते. त्यावेळी वाळू वाहत असलेलया टिपर चालकाला दुचाकस्वार दिसला नाही. त्यामुळे झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. परिसरात रात्रीच्यावेळी अवैध वाळू तस्करी सुरू आहे. त्यामुळेच एकाच कुटुंबातील तिघांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाताचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.