सोन्या-चांदीच्या दरांमध्ये ‘तेजी’, जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या भावात बुधवारी पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याच्या दरात दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी 0.16 टक्के वाढ पाहायला मिळाली. एमसीएक्स एक्सचेंजवर ऑक्टोबर महिन्यात गोल्ड फ्यूचरचे भाव 0.16 टक्के अर्थात 61 रुपयांनी वाढले. यामुळे ऑक्टोबर महिन्यात गोल्ड फ्युचरचे भाव 38,169 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

तर एमसीएक्स एक्सचेंजवर डिसेंबर महिन्यात गोल्ड फ्यूचरच्या भावात थोडीफार वाढ पाहायला मिळाली. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी 1 वाजून 40 मिनिटांची डिसेंबर महिन्यासाठी गोल्ड फ्यूचरच्या किंमतीत 0.05 टक्के अर्थात 21 रुपये तेजी पाहायला मिळाली. याच तेजीने डिसेंबर महिन्यात गोल्ड फ्यूचरच्या किंमती 38,896 रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्या होत्या.

चांदीच्या भावाचा विचार केला दर डिसेंबर महिन्यात चांदी फ्यूचरच्या भावात बुधवारी 1 वाजून 44 मिनिटांवर एमसीएक्स एक्सचेंजवर 0.41 टक्के अर्थात 195 रुपयांनी तेजी वाढली होती. तसेच तेजीमुळे डिसेंबर महिन्यात चांदी फ्यूचरचे भाव 48,217 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बुधवारी न्यूयॉर्कमध्ये सोने 0.27 टक्क्यांनी कमी होऊन 1,536 डॉलर प्रति औंस झाले, मंगळवारी एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार सोने 330 रुपयांच्या तेजीने 39,020 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाले तर चांदी 730 रुपयांनी वाढून 48,720 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Visit : policenama.com