खुशखबर ! सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफ बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरणं होताना दिसली. सोमवारी सोने 85 रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे सोने 38,775 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय किंमतीचा परिणाम स्थानिक बाजारात झाला. यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. शनिवारी सोने 38,860 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

एचडीएफसी सिक्युरीटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या भावात 85 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली. पटेल यांनी सांगितले की, मागणी घटल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीत देखील घसरण पाहायला मिळाली. चांदी सोमवारी 290 रुपयांनी स्वस्त झाली. या घसरणीमुळे चांदी 45,250 रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात चांदी 45,540 रुपये प्रति किलोग्रॅम होती. औद्योगिक क्षेत्रात आणि शिक्के बाजारात लिलाव घटल्याने चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात न्युयॉर्कमध्ये सोने 1,464 डॉलर प्रति औंस तर चांदी 16.88 डॉलर प्रति औंस होती.
पटेल म्हणाले की, अमेरिका चीनमधील व्यापार करार सकारात्मक मार्गावर असून गुंतवणूकदारात उत्साह दिसत आहे.

Visit : Policenama.com