सोन्याच्या दरात किंचीत वाढ तर चांदी स्वस्त झाली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफ बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसली. दिल्लीत सोने 5 रुपयांनी महाग झाले. यामुळे सोन्याच्या भावात वाढ होऊन सोने 39,105 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ रुपया घसरल्याने झाली. काल सोने 39,100 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

चांदी स्वस्त –

आज चांदीच्या किंमतीत घसरणं होताना दिसली. त्यामुळे 91 रुपयांनी भाव कमी होऊन 46,809 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. तर सोमवारी चांदीची किंमत 46,900 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत 24 कॅरेट सोने 5 रुपये महागले, ज्यामुळे सोन्याचे भाव वाढून ते 39,105 वर पोहचले. ते म्हणाले की डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने ही सोन्यातील वाढ पाहायला मिळाली.

जागतिक स्तरावर मंगळवारी सोने न्यूयॉर्कमध्ये 1493.30 डॉलर प्रति औंस होते तर चांदी 17.62 डॉलर प्रति औंस होती.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी