खुशखबर ! पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली होती. मात्र आता परिस्थिती सामान्य झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील चढ उतार पाहायला मिळत आहेत. सध्या तेलाच्या दरामध्ये घट होताना दिसून येत आहे.

कोणत्या शहरात किती दर, जाणून घ्या –

आज राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 73. 42 रुपये लिटर झाले आहेत. 12 पैश्यांची आज पेट्रोलमध्ये घट झाली आहे. त्याचबरोबर दिल्लीत डिझेलचे दर देखील कमी झाले आहेत. 15पैश्यांनी कमी होऊन दिल्लीत आज डिझेलचा दर 66.60 रुपये प्रतिलिटर झाला आहे.

पेट्रोलमध्ये १२ पैश्यांची घट झाली असून मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 79.03 रुपये लिटर झाले आहेत. मुंबईत आज डिझेलचा दर 69.81 रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलच्या दरात 12 पैश्यांची घट झाली आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 76.25 रुपये लिटर झाले आहेत. तर डिझेलचा दर 70.35 रुपये प्रति लीटर झाला आहे.

तर कोलकात्यात पेट्रोलचे दर 76.07 रुपये लिटर झाले आहेत. तर डिझेलचा दर 68.96 रुपये प्रति लीटर झाला आहे.

तर दिल्लीच्या शेजारी असणाऱ्या नोयडा आणि गुरुग्राममध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये घट झाली आहे. येथे पेट्रोल 75.01 रुपये प्रति लीटर असून डिझेल 66.86 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर गुरुग्राममध्ये पेट्रोल 73.21 रुपये प्रति लीटर असून डिझेल 65.78 रुपये प्रति लीटर आहे.

Visit : Policenama.com