Covid-19 नं आपल्याला Restart च्या आधी Reset करण्याची संधी दिली, शहरी केंद्रांचा करावा लागेल कायापालट : PM मोदी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘3rd Annual Bloomberg New Economy Forum’ ला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी या फोरममध्ये आपल्या भाषणाच्या दरम्यान विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की कोविड -19 च्या साथीने जगाला रिस्टार्ट करण्याआधी रीसेट करण्याची संधी दिली आहे. ते म्हणाले की, ‘सध्याच्या कोविड -19 साथीने जगाला हे दाखवून दिले की शहरे, जी विकासाची इंजिन देखील आहेत, सर्वात कमकुवत आहेत.’

पंतप्रधान मोदींनी या फोरममध्ये ज्या मुख्य गोष्टी मांडल्या त्या जाणून घेऊया:

– पीएम मोदी म्हणाले, ‘कोविड -19 ने आपल्याला रिस्टार्ट करण्यापूर्वी रीसेट करण्याची संधी दिली आहे. आता रिस्टार्ट करण्याचा एक प्रभावी बिंदू म्हणजे शहरी केंद्रांचा कायाकल्प होईल.

– पीएम मोदी म्हणाले, ‘लॉकडाऊनला जगभरात प्रतिकारांचा सामना करावा लागला. परंतु भारतीय शहरांमध्ये लॉकडाऊनचे नियम पाळले गेले आहेत, कारण आपल्या शहरांमधील सोसायटी ही फक्त घरांनी व्यापलेली जागा नाही तर एक समुदाय आहे.

– पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘काय आपण टिकाऊ शहरे बांधू शकत नाही का? भारतात असा प्रयत्न केला गेला आहे की आपण अशा शहरी केंद्रांची निर्मिती करावी, ज्यांमध्ये शहरांची सुविधा असेल, परंतु खेड्यांसारखी भावना देखील असेल. तंत्रज्ञानाने आपल्याला कोविड -19 साथीच्या काळात आपले काम चालू ठेवण्यास मदत केली आहे.’

– पीएम मोदी म्हणाले, ‘सध्याच्या कोविड-19 साथीने जगाला हे दाखवून दिले की शहरे, जी विकासाची इंजिन देखील आहेत, सर्वात कमकुवत आहेत.’

– पंतप्रधान मोदी म्हणाले की, जागतिक युद्धानंतर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात बदल दिसून आले. कोविड-19 ने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची समान संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. जर आपल्याला भविष्यासाठी मजबूत यंत्रणा विकसित करायच्या असतील तर आपल्याला या संधींचा फायदा घ्यावा लागेल.

पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली आहे की ब्लूमबर्ग न्यू इकोनॉमिक फोरमची स्थापना मायकेल ब्लूमबर्ग यांनी 2018 मध्ये केली होती. जगातील कठीण आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी जगभरातील नेत्यांना चर्चेच्या एकाच व्यासपीठावर आणणे हे या फोरमचे उद्दीष्ट आहे. या फोरमची पहिली बैठक सिंगापूरमध्ये झाली होती. तसेच दुसरी बैठक बीजिंगमध्ये आयोजित केली गेली होती. यामध्ये जागतिक आर्थिक व्यवस्थापन, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, शहरीकरण, भांडवली बाजार, हवामान बदल अशा मुद्द्यांवर चर्चा झाली होती.