भाजप म्हणतंय ‘ठरल्याप्रमाणे करा’, आता शिवसेना सांगते ‘तसं ठरलंच नव्हतं’ !

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेमध्ये शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी याबाबत भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तसं ठरलं होतं असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, असे काहीच ठरलं नव्हत अशी भूमिका भाजपने घेत शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला.राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्याचा परिणाम महापालिका निवडणुकांमध्ये पहायला मिळत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर युतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पाच वर्षामध्ये एक वर्ष महापौरपद भाजपला देण्याचे ठरले होते. त्यानुसार पहिली अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेने भूषविल्यानंतर एक वर्षासाठी महापौरपद भाजला सोडण्याची शक्यता होती. परंतु राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटला नसल्याने राज्यात सत्ता स्थापनेची नवी समिकरणे उदयास येताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपला महापौरपद देईल की नाही यामध्ये शंका आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक 2015 मध्ये झाली. ही निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढवली.

या निवडणुकीत शिवसेनेला 53 भाजपला 43, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, मनसे 9, अपक्ष 9 असे नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र आले. शिवसेनेला चार अपक्षांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ 57 झाल्याने शिवसेनेला अडीच वर्ष महापौर पद आणि भाजपला एक वर्ष महापौर पद देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. शिवसेनेच्या अडीच वर्षाच्या महापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर भाजपने महापौर पदावर दावा केला होता. मात्र, शिवसेनेने महापौर पद शिवसेनेकडेच ठेवेवा यासाठी भाजपकडे गळ घातली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महापौरपद शिवसेनेकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्याने शिवसेना भाजपला महापौरपद देणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Visit : Policenama.com