धक्‍कादायक ! विद्यापीठातील गर्दीमध्ये माझे कपडे फाडले, भाजपच्या ‘या’ महिला नेत्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील जाधवपुर विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसेविरोधात भाजप नेत्या अग्‍निमित्रा पॉल यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.  विद्यार्थ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आपले कपडे देखील फाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अग्‍निमित्रा पॉल यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, गुरुवारी विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह आमंत्रण होते. हा कार्यक्रम विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेने आयोजित केला होता. कार्यक्रम स्थळी आम्ही प्रवेश करत असताना काही विद्यार्थ्यांनी आमचा रास्ता अडवून घोषणाबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांनी दिल्या शिव्या

अग्‍निमित्रा पॉल यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि,यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यापीठातील विद्यार्थी होते. काही काळानंतर त्यांनी हिंसा करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर शिव्यादेखील देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना देखील त्यांनी मोठा त्रास दिला. तेथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती. जवळपास 4 तास त्यांना अडवून ठेवण्यात आले. तसेच माझे कपडे देखील फाडल्याचा आरोप पॉल यांनी केला आहे.

दरम्यान, याआधी देखील देखील बाबुल सुप्रियो यांनी गैरवर्तनाचा तसेच मारहाणीचा आरोप केला होता. एका विद्यापीठात कार्यक्रमासाठी गेले असताना सुप्रियो यांच्याशी हा प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like