BJP leader Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणाबाजी

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा फुले यांच्या विरोधात केलेल्या अपमानजनक विधानामुळे अनेकांच्या निशाण्यावर असलेले राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (BJP leader Chandrakant Patil) यांनी अखेर त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरीही त्यांच्यावर होणारी टीका कमी झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात ‘चंद्रकांत पाटील हाय हाय’ म्हणत आंदोलन केले आहे. (BJP leader Chandrakant Patil)

 

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील (BJP leader Chandrakant Patil) पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार आहेत. त्यांच्या कोथरूडमधील कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने ही घोषणाबाजी केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही त्यांच्या या विधानावर टीका केली होती. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्याचे तुम्ही आमदार आणि पालकमंत्री आहात, त्यामुळे तुम्हाला असे बोलणे शोभत नाही, असे अजित पवार म्हणाले.

 

तत्पूर्वी, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांनी या देशात शाळा सुरू केल्या.
या सगळ्यांनी शाळा सुरू केल्या तेव्हा सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही.
त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चारही बाजूंनी टीका सुरू होती.
अखेर चंद्रकांत पाटलांनी, कुणाची मने दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचे आवाहन केले.

 

Web Title :- BJP leader Chandrakant Patil | controversial statement of chandrakant patil increased anger in pune ncp news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई