चंद्रकांत पाटलांचा पलटवार, म्हणाले – ‘अजित पवारांनी तोंड सांभाळून बोलाव, आम्ही बोलायला लागलो तर फार अवघड होईल’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार झोपेत असतानाच पडेल असे विधान भाजचपे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी दोन दिवसापूर्वी केले होते. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुतेक पाटील झोपेतच असे बोलले असतील, असा चिमटा काढला होता. पवारांच्या या टीकेला पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाटील म्हणाले की, शरद पवार झोपेतून उठायच्या आधी शपथ घेऊन तुम्ही मोकळे झाला होता. तुम्ही आमच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी झाला.शपथही घेतली, पण 28 आमदार सुद्धा तुम्हाला सोबत ठेवता आले नाहीत. त्यामुळे यापुढे आमच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला. आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर फार अवघड होईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी जोरदार टोला लगावला आहे. हा देश गांधी-नेहरू यांच्या विचारावर चालला असल्याचे विधान राऊतांनी केले होते. त्यावरूनही पाटील यांनी त्यांना टोला हाणला. राऊत यांचे हे मत ऐकलं तर बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून त्यांना थोबाडीत मारतील, असे ते म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत जे जे संघर्ष करतील, त्यांच्यासोबत भाजप असेल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. शरद पवार असो, अजित पवार असो वा संभाजी राजे, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणीही संघर्ष करणार असेल तर त्यांचा शिलेदार म्हणून मी त्यांच्यासोबत असेन. पण, कोरोनाचे नाव पुढे करून संघर्ष टाळला जात असेल तर हा प्रश्न सुटणार नाही. आणखी किती दिवस शांत बसायचे, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. ‘छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका सरकारच्या बाजूची असेल तर ती आम्हाला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Also Read This : 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या