‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देईल, चित्रा वाघ यांचा मंत्री यशोमती ठाकूरांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोर्टानं दोषी ठरवत 3 महिने तुरुंगवास आणि 15000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर टीका करण्यात येत असून भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. यशोमती ठाकूर यांनी गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता, पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?’, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी यशोमती यांना टोला लगावला आहे.

यावर यशोमती ठाकूर यांनी एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील, असे म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे. पण, भाजपनं यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता यशोमती ठाकूर प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.त्यानंतर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल’, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.

अखेर नक्की काय आहे प्रकरण ?

24 मार्च 2012 ला अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाची हुज्जत घातल्या प्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस कॉन्सेटबलवर हात उगारल्याचाही आरोप होता. त्यानंतर अखेर आठ वर्षांनी न्या. उर्मिला जोशी यांनी यशोमती ठाकूर यांना प्रकरणात शिक्षा सुनावली.

पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत घातली. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आदी कलमं यशोमती ठाकुरांवर लावण्यात आली होती.