‘चोराच्या उलट्या बोंबा’ ! आमदारांच्या पक्ष सोडण्याबाबत भाजपच्या बड्या नेत्यानं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे डझनभर आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. महाविकासआघाडीकडून भाजपला मोठा धक्का दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या झालेल्या मेगाभरतीला आता ओहोटी लागणार आहे असे म्हटले जात आहे. या सगळ्यावर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चा खोट्या असून चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

आशिष शेलार म्हणाले, “या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. महाविकासआघाडीतच आमदारांची अस्वस्थता आहे. आम्ही ही नाकारतो की, आमचे आमदार फुटणार आहेत किंवा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. भाजपचा कोणताही आमदार कोणाच्याही संपर्कात नाही. महाविकासाआघाडीनं केवळ आश्वासनं दिली परंतु ते आता पूर्ण करायला जमत नसल्यानं ते आता उलट्या बोंबा मारत आहेत. आमचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत.”

एकनाथ खडसेंनी पक्षात नाराजी असल्याचं उघडपणे म्हटलं होतं. याबाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, “एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली असली तरीही त्यांनी म्हटलं होतं की, मी पक्षासोबत आहे. त्यांचे विषय पक्षातील अंतर्गत विषय आहे. खडसे ते सर्व विषय पक्षासमोर मांडतीलच.” असे त्यांनी सांगितले.

भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असून त्याला सत्तेपासून दूर रहावं लागलं आहे. काही आयारामांनी सत्तेच्या लालसेपोटी ऐन निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. हेच नेते पुन्हा सत्तेच्या दिशेनं निघाणार असल्याचं दिसत आहे. यात अनेक जुन्या जाणत्या नेत्यांचाही समावेश आहे. अनेक नेते पक्षात नाराज आहेत. अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या संपर्कात आहेत अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या गोष्टीला दुजोरा दिल आहे की, काही नेते परवारांच्या संपर्कात आहेत.

महाविकासआघाडीच्या सरकारनं पहिल्याच आठवड्यात भाजपला दणका दिला आहे. भाजपमधील अनेक नेते असे आहेत जे पक्षात आजही नाराज आहेत. राज्यसभेतील खासदारही नाराज आहेत. सर्व नाराज नेते आपली वेगळी मोट बांधण्याच्या तयारीत आहेत असे समजत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही पक्षात नाराजी असल्याचं उघडपणे म्हटलं होतं.