भाजपला मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्यानं दिला राष्ट्रवादीला पाठिंबा

माळशिरस (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूक आठवडाभरावर येऊन ठेपल्या असताना भाजपला माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. या भाजपने बाहेरचा उमेदवार दिल्याने जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ नेते व स्थानिक उमेदवार उत्तमराव जानकर यांना डावलून राम सातपुते यांना संधी दिली आहे. त्यामुळे जानकर राष्ट्रवादीत गेले. जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

धवलसिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत. मात्र त्यांचे फारसे पटत नाही. त्यामुळे आता माळशिरसमध्ये भाजप विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होण्याऐवजी मोहिते पाटील विरूध्द मोहिते पाटील असा सामना होणार आहे.

Visit : Policenama.com