‘राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याची परंपरा’, कृषी विधेयकावरून शरद पवारांवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    शेतकऱ्यांसाठी संसदेत नवीन कृषी विधेयक आणलं असून या विधेयकावरून अनेक गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. पंजाब, हरियाणा या ठिकाणी या विधेयकाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तर या संपूर्ण प्रकारावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही. शेतकरी विधेयक तात्काळ रद्द करावं अशी मागणी शरद पवारांनी केली होती.

कृषी विधेयक आणि राजकारण यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अतुल भातखळकर म्हणाले, “आत्मचरित्रात कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकाधिकार मोडून काढण्याचा जोरदार पुरस्कार करणारे शरद पवार आज राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याच्या परंपरेनुसार मोदी सरकारच्या एकाधिकारशाही मोडून शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या कृषी विधेयकांना विरोध करत आहेत असा टोाल त्यांनी पवारांना लगावला आहे. या संदर्भात अतुल भातखळकर यांनी लोक लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेतील उल्लेखाचा हवाला दिला आहे.

कृषी विधेयक पास झाल्यावर काय म्हणाले शरद पवार ?

नव्या कृषी कायद्यामागचा हेतू वाईट नसला तरी केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. कांदा निर्यातीवरही त्यांनी लक्ष वेधलं होतं. एकीकडे तुम्ही बाजारपेठ खुली करता मग कांदा निर्यातीवर बंदी का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यसभेत यापूर्वी जे घडलं नाही ते पाहायला मिळालं. राज्यसभेत कृषी विधेयकं येणार होती त्यावर 2-3 दिवस चर्चा अपेक्षित असते. मात्र ही विधेयकं तातडीनं मजूर व्हावी अशी सत्ताधारी पक्षाची भूमका होती सदस्यांना प्रश्न होते, चर्चा करण्याचा आग्रह होता. पण तरीही सभागृहाचे काम पुढे रेटून नेण्याचं दिसत होतं असा आरोप शरद पवारांनी केला होता.