BJP MLA Join NCP and Shivsena | राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला मोठं खिंडार पडणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कारण भाजपमधील अनेक आमदार हे सत्ताधारी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश (BJP MLA Join NCP and Shivsena) करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे काही आमदार हे येत्या काही दिवसांमध्ये (BJP MLA Join NCP and Shivsena) राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला मोठं खिंडार पाडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केली आहे.
भाजपच्या काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे.
भाजप आमदारांचा पक्ष प्रवेश पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
तर काही आमदार हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
त्यासाठी शिवसेना आणि राष्टवादीने मोठी रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही आमदारांनी राष्ट्रवादीमध्ये तर काही आमदारांनी स्थानिक परिस्थिती पाहता शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भाजपमधील कोणते आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करणार हे अद्याप समजू शकले नाही.
त्यामुळे ते आमदार कोण याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

ते ठाकरे स्टाईल भाषण होते – संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्यात जे वक्तव्य केलं ते ठाकरे स्टाईल भाषण होते.
उद्धव ठाकरेंनी कुठेही म्हटलं नाही की, नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल किंवा आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत.
त्यांनी बोट दाखवून, नाव घेऊन सांगितलं आहे आणि ज्या हालचाली राजकारणात दिसत आहे. विशेषत: चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेलं वक्तव्य की माजी मंत्री म्हणू नका.
याचाच अर्थ असा की, कुणीतरी तिकडे आहे ज्यांना इथे यायचे आहे आणि उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही या. बरेच लोक येऊ इच्छितात असं म्हणत त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.

Web Title : BJP MLA Join NCP and Shivsena | major blow to maharashtra bjp as many mla may join shiv sena ncp in coming days said sources

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | शेतकर्‍याकडेच एक कोटी रूपयाची मागणी; मंगलदास बांदलला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

WhatsApp New Feature | ‘व्हॉट्सअ‍ॅप’नं आणलं नवं फिचर; एकच अकॉउंट 4 डिव्हाइसेसवर ओपन होणार

Pensioner ला Life Certificate देण्यासाठी मिळेल जास्त वेळ, ‘या’ केंद्रांवर करू शकतात जमा