BJP MLA Suspended | आशिष शेलार, भातखळकर यांच्यासह भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन, विरोधकांना धक्काबुक्की भोवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi government) आणि विरोधक आमने सामने आले. दरम्यान, धक्काबुक्की करणार्‍या भाजपच्या तब्बल 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत (12 BJP MLA Suspended) करण्यात आलं आहे. यामुळं विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. विरोधक्कांनी केलेली ही धक्काबुक्की त्यांना चांगलीच महागात पडली आहे. (Maharashtra Assembly Speaker suspends 12 BJP MLAs for one year, for creating ruckus in the House, during the ongoing Assembly session)

राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतचा इंपिरिकल डाटा (empirical data) केंद्र सरकारनं उपलब्ध करून द्यावा असा ठराव मांडला. त्यानंतर लागलीच विरोधकांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. भाजपाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जबरदस्त घोषणाबाजी केली. काहींनी अध्यक्षांचा माईक देखील ओढला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात धक्काबुक्की केल्याचा दावा सत्ताधार्‍यांनी केला. सत्ताधार्‍यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित 12 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळेच आता 12 आमदारांवर निलंबनाची कारवर्इा करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

निलंबीत करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे आशिष शेलार, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, नारायण कुचे, संजय कुटे, जयकुमार रावल, गिरीश महाजन, हरिष पिंगळे, बंटी बागडीया, राम सातपुते आणि योगेश सागर यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, सभागृहातील ही घटना काळीमा फासणारी असल्याचं गोंधळानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निवेदन देत सांगितलं.
ते म्हणाले, राज्याच्या इतिहासात असे कधी झाली नाही,
हे वर्तन लांछनास्पद आहे. आमदारांनी राजदंड ओढण्याचा प्रयत्न केला.
यापुर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडलेले नाही.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अध्यक्षांना धक्काबुक्की झाली नाही,
पण, त्याचवेळी आमच्या काही आमदारांचे शब्द चांगले नव्हते.
ते मी मान्य करतो. त्याबाबत माफी मागण्यात आली आहे.
सत्ताधार्‍यांनी विरोधकांना बोलवावं आणि चर्चा करावी.
चर्चा न करता कारवाई करू नये असे देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bhimrao Tapkir | …म्हणून खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर अधिवेशनास उपस्थित राहणार नाहीत

MPSC Student Swapnil Lonkar Suicide Case | पुण्यातील स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला आली जाग, घेतला मोठा निर्णय

Pregnancy Diet | …म्हणून गर्भावस्थेत ‘या’ 5 गोष्टींचं सेवन करणं अत्यंत उपयुक्त

Web Title :- BJP MLA Suspended | Maharashtra Assembly Speaker suspends 12 BJP MLAs for one year, for creating ruckus in the House, during the ongoing Assembly session