भाजपच्या आमदाराच्या मामाची मारेकर्‍यांकडून गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीच्या गाझियाबाद जिल्ह्यात भाजपा आमदाराच्या नातेवाईकाची सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाजपा आमदार अजीत पाल त्यागी यांचे मामा नरेश त्यागी (60) यांच्यावर स्कुटीवरुन आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. हि घटना सिहानी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नरेश त्यागी हे मॉर्निग वॉकसाठी गेले असताना त्यांची हत्या करण्यात आली आहे.आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांच्याकडून परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. याप्रकरणी एसएसपींकडून घटनेच्या चौकशीसाठी 4 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नरेश त्यागी हे सरकारी ठेकदार होते, पीडब्लूडी आणि आरईएस विभागातील कामांची ठेकेदारी ते करत असल्याची माहिती नातेवाईकाकांकडून देण्यात आली आहे.

आज सकाळी नरेश त्यागी हे घरासमोरील गार्डनमध्ये मॉर्निक वॉकसाठी गेले असता स्कुटीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. नरेश त्यागी हे मूळचे मुरादनगर क्षेत्रातील सारा गावचे रहिवाशी होते. त्यांची दोन्ही मुले शेखर आणि अश्विन त्यागी हेसुद्धा ठेकेदारीचेच काम करतात. एसएसपी कलानिधी नैथानी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.