पंकजा मुंडेंच्या ‘पोस्टर’वरून ‘कमळ’ गायब ! राज्याचं ‘लक्ष’ गोपीनाथ गडाकडे

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी उद्या संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची गोपीनाथ गडावर जय्यत तयारी सुरु आहे. मात्र पंकजा मुंडेंच्या या मेळाव्यातून भाजप गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पोस्टर्सवर कुठेही भाजपचं कमळ चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नाहीत. त्यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे. यापूर्वी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे 12 डिसेंबरला आपली भूमिका जाहीर करणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. तसेच ट्विटर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाचे नाव हटविले होते. तसेच आजारी असल्यामुळे पंकजा मुंडे भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला सोमवारी अनुपस्थित होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या पक्षातच राहणार असून त्या पक्षांतर करणार या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले होते.

पंकजा मुंडे यांनी येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.’12 डिसेंबर’ रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या.. वाट पहाते’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच उद्या त्या काय भूमिका मांडतील याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com

उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे