फोन ‘टॅपिंग’ची माहिती भाजपच्या ज्येष्ठ ‘मंत्र्यानं’ दिली होती, संजय राऊत यांचा ‘दावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात तुमचे फोन टॅप होत असल्याची माहिती भाजपमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने मला दिली होती, असा दावा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या दाव्याने खळबळ उडाली असून संजय राऊत यांना माहिती देणारा तो भाजपचा ज्येष्ठ मंत्री कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. संजय राऊत यांच्या दाव्याने भाजपच्या गोटात देखील खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे फोन विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप झाला होता. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी हा दावा केला आहे.

sanjay raut

तुमचे फोन टॅप होत आहेत, या संदर्भात माहिती मला भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. त्यावेळी माझं बोलणं कुणाला ऐकायचं असेल तर, त्यांचे स्वागतच करतो. मी बाळासाहेब ठातरेंचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपूनछपून करत नाही. माझं बोलणं ऐकाच, असं मी म्हणालो होतो, असा दावा राऊत यांनी ट्विटरद्वारे केला आहे. संजय राऊत यांनी एका हिंदी वृत्तपत्राचा फोटो ट्विट करून हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपचा तो ज्येष्ठ मंत्री कोण अशी कुजबुज सुरु झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like