युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड है , टूटेगा नाही …!

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – युतीपुर्वी एकमेकांवर ताशेरे ओढणाऱ्या भाजप शिवसेनेची सध्याची परिस्थिती तुझ्या गळा , माझ्या गळा ! अशी आहे. अमरावती येथील महामेळाव्यात  पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिवसेनेची युती अभेद्य असल्याचे सांगितले . युती म्हणजे ‘फेव्हिकॉलचा मजबूत जोड है टूटेगा नाही’ असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षाला टोला लगावला.

अमरावती येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर आघाडीतील अनेकांच्या डोळ्यातून पाणी आले होते . पण युती म्हणजे ‘फेव्हिकॉलचा मजबूत जोड है टूटेगा नाही’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला . भाजप – सेना यांची युती अभेद्य आहे, ती केवळ निवडणुकीसाठी नाही. भाजप आणि शिवसेना यांचा अमरावती येथे महामेळावा होता तेथे मुख्यमंत्री बोलत होते . यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंना मुंबई दुर्घटनेचा विसर ?

दरम्यान या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते . मात्र त्यांनी आपल्या भाषणात मुंबई येथील पूल दुर्घटनेचा साधा उल्लेख देखील केला नाही याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले , ते राष्ट्रहिताचे होते , अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं . मात्र पूल दुर्घटनेविषयी चकार शब्दही काढला नाही . त्यामुळे आपली मुंबई म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांची संवेदशीलता गेली कुठे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us