…म्हणून सरकार आलं नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिली ‘कबुली’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षाबाबत कुणाचाही कसलाही आक्षेप असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पक्षाविरोधात बोलणाऱ्या आणि शिस्तीचे पालन न करणाऱ्यांवर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल. रोज उठून पक्षाविरोधी बोलणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच एकोप्याने वागलो नाही म्हणून राज्यात भाजपचे सरकार आले नाही, अशी कबुली देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरील मेळाव्याची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरु आहे. या मेळाव्यात भाजपमधील अनेक नाराज नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी भाजप नेत्यांवर असलेले नाराजीचे स्वर स्पष्टपणे एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवले तर पंकजा मुंडे यांनी मी पक्ष सोडणार नाही कारण हा पक्ष माझ्या बापाचा आहे असे ठणकावून सांगिलते. भाजपमधील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे पहिल्यांदाच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले.

पंकजा मुंडे यांच्यावर नाराज
परळीतील भाषणानंतर चंद्रकांत पाटील यांनी बंड केल्याशिवाय न्याय मिळत नाही असे म्हणत मतभेद असतील तर ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत असे सांगितले. यावेळी बोलताना पाटील यांनी पंकजा मुंडे याच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

परळीत काय म्हणाल्या पंकजा मुंडे
-पराभवाने खचून जाणारी मी नाही.
-ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली त्यावेळी तुमचे सूत्र कुठे होते, मीडियाला केला सवाल.
-मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते.
-माझा पराभव कसा झाला यावर आता पुस्तक लिहावे लागेल.
-पक्षाने मला कोअर कमिटीतुन मुक्त करावे.
-मी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कार्यालय सुरु करून नवीन वज्रमूठ तयार करणार.
-मशाल घेऊन ठिकठिकाणी राज्यभर दौरा करणार.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/