‘गुगल’वरील राजकीय जाहिरातींमध्ये भाजपाचा पहिला क्रमांक तर काँग्रेस ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभेला सुरुवात केली आहे. अशात सर्च इंजिन गुगलवर मोठ्या प्रमाणात राजकीय जाहिराती करण्यात आल्या आहेत. दरम्यान गुगलवरील जाहिरातींमध्ये भाजपा नंबर एकवर असल्याचं समजत आहे. गुगलवर करण्यात आलेल्या एकून राजकीय जाहिरातींमध्ये भाजपाच्या जाहिरातींचा ३२ टक्के वाटा आहे. तर गुगलवरील राजकीय जाहिरातींमध्ये काँग्रेसचे स्थान सहावे असून काँग्रेसचा जाहिरातींमधील वाटा हा ०.१४ टक्के आहे.

राजकीय जाहिरातींवर राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संबंधितांनी १९ फ्रेब्रुवारी २०१९ पर्यंत एकूण ३.७६ कोटी रुपये खर्च केले आहेत. इंटरनेट जायटंस इंडियन ट्रान्स्परन्सी ने याबाबत आज (गुरुवार दि ४ एप्रिल) अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

राजकीय जाहिराती करणाऱ्या इतर पक्षांच्या तुलनेत भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपाने राजकीय जाहिरातींवर १.२१ कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपानंतर राजकीय जाहिरातींवर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या बाबतीत आंध्र प्रदेशातील जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचा क्रमांक लागतो. वायएसआर काँग्रेसने राजकीय जाहिरातींवर १.०४ कोटी रुपये खर्चे केले आहेत. तर वायएसआरनंतर तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमोटींग करणाऱ्या प्रमान्या स्ट्रटेजी कन्सल्टिंग प्रा. लि. या कंपनीचा, या कंपनीने राजकीय जाहिरातींसाठी ८५.२५ कोटी रुपये खर्चे केले आहेत. याबाबतीत काँग्रेसचा सहावा क्रमांक असून काँग्रेसने राजकीय जाहिरातींवर ५४ हजार १०० रुपये खर्च केले आहेत. अशी माहिती इंटरनेट जायटंस इंडियन ट्रान्स्परन्सीच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

याशिवाय, डिजीटल कन्सल्टिंग प्रा. लि. ही आणखी एक कंपनी नायडू यांच्या पक्षाच्या प्रचाराची सांभाळते. त्या कंपनीने जाहिरातीसाठी ६३.४३ लाख रुपये खर्च केल्याचे दिसून आले आहे. परंतु काही जाहिराती या गुगलच्या धोरणात बसत नसल्याने गुगलने ११ पैकी ४ जाहिरातदारांच्या जाहिराती थांबवल्या आहेत असेही समजत आहे.