भाजपाचं आज दुपारी 4 वाजता सत्तास्थापनेचं ठरणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपालांनी सत्तास्थापनेबाबत आमंत्रण दिल्यानंतर भाजप नेमका कोणता निर्णय घेणार याकडे इतर सर्वच राजकीय पक्षांसह संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यावर भाजपा आज दुपारी 4 वाजता होणार्‍या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय हलचालींना प्रचंडवेग आला आहे.

मुख्यमंत्री पदावर शिवसेना आणि भाजपामध्ये प्रचंड तेढ निर्माण झाले आहे. दुसरीकडे पहिल्या दिवसापासुनच शिवसेनेची भाषा बदलली असल्याचं भाजपनं सांगितलं आहे. सत्तास्थापनेसंदर्भात भाजपा सर्वात मोठा निर्णय घेणार आहे. काँग्रेसच्या जयपुर येथील झालेल्या बैठकीत काँग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी मागणी केल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी अद्याप काँग्रेसकडून मला अधिकृतरित्या कळवलं नाही असं सांगितलं आहे.

त्यामुळे भाजपा नेमका काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी चार वाजता होणार्‍या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे हे सहभागी होणार आहेत.

Visit : Policenama.com