धुळे : पंचायत समितीवर फडकला भाजपाचा झेंडा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन (विजय डोंगरे) – शहरातील देवपुरातील वाडिभोकर रोड पंचायत समितीच्या कार्यालयात गुरवारी दुपारी तीन वाजता सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली.

भाजप पक्षा वतीने खेडे गणातून उमेदवार विजय भगवान पाटील व उपसभापती पदासाठी निमगुळ गटातून विद्याधर अभिमान पाटीलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर महाआघाडीच्या वतीने सभापती पदासाठी देवेंद्र माळी व उपसभापती पदासाठी लक्ष्मण तुकाराम पाटील यांनी पिठासीन अधिकारी तहसिलदार किशोर कदम यांचेकडे सादर केले. आघाडीचे उमेदवार संख्या एकुण 9 व भाजपकडे 21 अशी संख्या असल्याने महाविकास आघाडीच्या दोघे उमेदवारांनी सभागृहात पिठासन अधिकारी यांचे समोर आम्ही आमचे उमेदवारी अर्ज माघारी घेत आहोत असे घोषित केले. या नंतर पिठासन अधिकारी यांनी सभापती व उपसभापती पदासाठी एक,एक उमेदवारी अर्जच दाखल झाल्याने सभपती पदी विजय भगवान पाटील व उपसभापती पदी विद्याधर अभिमान पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. दोंघांना प्रमाणपञ देण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात आजचे सभेचे कामकाज संपले असे घोषित करताच आवारात कार्यकर्त्यांनी फटाके, डि.जे.गुलाल उधळुन जल्लोष केला.

जिल्हा परिषद गटात स्व.मधुकर गर्दे यांचा जवाहर गटाने पराभव केला होता. परंतू आज द.वा.पाटील गटाने विजय पाटील यांना हा विजय मिळवून देत पंचायत समितीवर भा.ज.प पक्षाचा झेंडा फडकविला. यावेळी नवनियुक्त सभापती विजय पाटील व उपसभापती विद्याधर पाटील यांनी दालनात प्रवेश करत पदभार स्विकारला. त्यांचे स्वागत खासदार डॉ.सुभाष भामरे, सभापती सुभाष देवरे, मनोहर भदाणे, अनिकेत भदाणे, प्रा.अरविंद जाधव संजय शर्मा, युवा नेते राम भदाणे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, चंद्रकांत सोनार,हिरामण गवळी आदी.केले.

धुळे येथे पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झालेले उमेदवार विजय पाटील व उपसभापती विद्याधर पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी जव्लोष करताना भाजप खासदार डॉ.सुभाष भामरे, प्रा.अरविंद जाधव, मनोहर भदाणे, राम भदाणे, अनिकेत पाटील, रविंद्र पाटील, अनुप अग्रवाल, हिरामण गवळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like