#5YearChallange : कार्टून्सच्या माध्यमातून यूपीए सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सोशल मीडियावर सुरू असलेल्या #10Year Challange या ट्रेंडचा भाजपने फायदा उचलला असून तत्कालीन ‘यूपीए’ सरकारवर हल्ला चढवला आहे. भाजपची ही मोहीम आज सकाळी ट्विटरवर टॉप ट्रेंड होती. सोशल मीडियावर सध्या #10 YearChallange ची जोरदार चर्चा आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनेक जण त्यांचा १० वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा फोटो शेअर करत आहेत. १० वर्षात आपल्यात नेमका काय बदल झाला, हे दाखवण्याचा प्रयत्न यातून सुरू आहे.

भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून पाच वर्षाआधीच्या यूपीए सरकारमधील योजना, कामांचा उल्लेख करीत त्याची तुलना केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांसोबत केली आहे. ही मोहीम सुरू करताना यूपीए सरकारमधील रखडलेले अनेक प्रकल्प भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारने कसे पूर्ण केले आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

#5YearChallange च्या माध्यमातून वीज, गॅस जोडणी, स्वच्छता, बँक खाती, खतांची किंमत, रस्तेबांधणी, थेट परकीय गुंतवणूक, लष्कराशी संबंधित प्रकल्प यांच्या संदर्भातील आकडेवारी दाखवण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपानं काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

गॅस जोडणीसंदर्भात भाजपानं ट्विटरवर कार्टूनच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. २०१३ मध्ये लोकांना एलपीजी सिलिंडर मिळणं अवघड होतं. मात्र आता सिलिंडरची डिलेव्हरी थेट घरापर्यंत होते. याच प्रकारे आणखी एका कार्टूनमधून २०१३ मध्ये समोर आलेले यूपीए सरकारचे घोटाळे दाखवण्यात आले आहेत. काँग्रेसच्या काळात फक्त घोटाळे झाले. तर भाजपाच्या काळात देशाचा विकास झाला, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपानं केला आहे.

gas
#5YearChallange मधून भाजपानं स्वस्त घरांच्या योजनेवरुनही यूपीए सरकारला लक्ष्य केलं. याशिवाय आधीच्या सरकारमधील आरोग्य योजना आणि भाजपाच्या आरोग्य सुविधांचीही तुलना करण्यात आली आहे.

home

#5YearChallange मध्ये देशातील सर्वात लांब पुलाचादेखील (बोगीबील) उल्लेख आहे. यावरही कार्टूनच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं आहे.

भाजपाचे आणि अनेक मंत्री आणि नेत्यांनी सोशल मीडियावर हा मोहिमेचं समर्थन केलं आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखाली २०१४ पासून देशात अनेक शानदार बदल केल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.