प्रचारासाठी जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमळनेरमध्ये काळे झेंडे दाखवले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – अमळनेर येथे मुख्यमंत्र्यांविरोधात धरणग्रस्तांनी निदर्शनं केली. तसेच मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. २० वर्षांपासून रखडलेल्या पडलसे धरणाचे काम पुर्ण करण्याची मागणीसाठी काळे झेंडे दाखविण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ७ ते ८ जणांना ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज अंमळनेर येथे प्रचारसभा होती. त्या प्रचार सभेला मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना धरणग्रस्तांनी काळे झेंडे घेऊन त्यांच्या ताफ्यासमोर निदर्शनं केली. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. रखडलेला पडलसे धरण प्रकल्प त्वरित पुर्ण करावा या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली. यावेळी काळे झेंडे दाखविणाऱ्या ७ ते ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.