Blood Pressure | ब्लड प्रेशर तपासण्यात 90 टक्केपेक्षा जास्त लोक करताता चूक, येथे जाणून घ्या योग्य पद्धत, स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला

नवी दिल्ली : Blood Pressure | इंडियन एक्स्प्रेसने अनेक डॉक्टरांच्या संदर्भाने म्हटले आहे की, ऑटोमॅटिक बीपी मशीनने ब्लड प्रेशर तपासताना अनेक चुका होतात. योग्यप्रकारे लोक तपासणी करत नाहीत. जर ब्लड प्रेशरची चाचणी योग्य नसेल तर डॉक्टरसुद्धा औषध नीट देऊ शकणार नाहीत. म्हणूनच ते स्टेप बाय स्टेप समजून घ्या (How to Measure Accurate Blood Pressure).

ब्लड प्रेशर तपासण्याचा स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला (Blood Pressure)

स्टेप – १ : जेव्हा ब्लडप्रेशर तपासण्यासाठी तयार असाल, तेव्हा सर्वप्रथम तेथील वातावरणात शांत राहा
आणि ५ मिनिटे आराम करा.

स्टेप – २ : पाय जमिनीवर सपाट ठेवा आणि पाठीला आधार देऊन आरामात बसा.

स्टेप – ३ : ऑटोमॅटिक बीपी मशीनमध्ये, ते चालवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली असतात,
त्याचे पालन करा. यानुसार बीपी मशिनचा कफ हाताच्या वरच्या बाजूला घट्ट गुंडाळा.

स्टेप – ४ : हातावर कफ व्यवस्थित सेट केल्यावर, बीपी मोजण्यासाठी ऑटोमॅटिक
मॉनिटरवरील स्टार्ट बटन दाबा.

स्टेप – ५ : जेव्हा मॉनिटर ब्लडप्रेशर रीडिंग दर्शवतो, तेव्हा कफ फुगत जाईल
आणि नंतर हळूहळू कमी होईल.

स्टेप – ६ : सिस्टोलिक (टॉप) आणि डायस्टोलिक (तळाशी) दोन्ही रीडिंगवर लक्ष द्या.

स्टेप – ७ : आता काही वेळ शांत आणि निवांत मुद्रेत राहा आणि तीच क्रिया पुन्हा करा.
पुन्हा मशीनचे रीडिंग नोंद करून घ्या.

स्टेप – ८ : दोनदा रीडिंग घेतल्यानंतर काही वेळ थांबा आणि तीच प्रक्रिया पुन्हा करा.
सामान्यपणे लोक ही चूक करतात की एकदाच रीडिंग घेतात.

स्टेप – ९ : आता तिन्ही रीडिंगची सरासरी काढा. सरासरी रीडिंग वास्तविक ब्लड प्रेशर असेल.

स्टेप – १० : वेळोवेळी ब्लडप्रेशर ट्रॅक करण्यासाठी रीडिंग लॉगमध्ये रेकॉर्ड करा किंवा
संबंधित स्मार्टफोन अ‍ॅप वापरा.
हे लॉग डॉक्टरांना दाखवू शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर