Blood Sugar Control | ब्लड शुगर कंट्रोल करण्यात उपयोगी ठरू शकते ‘हे’ एक फूल, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar Control | मधुमेह हा एक क्रॉनिक डिसिज आहे, जो अनियमित जीवनशैली आणि खराब आहारामुळे होतो. देशात मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्याने अस्पष्टता, अति थकवा, चिडचिड यासह अनेक समस्या उद्भवतात. (Blood Sugar Control)

 

चुकीचा आहार, अव्यवस्थित जीवनशैली, शारीरिक हालचाली न केल्याने लोक अशा आजारांना बळी पडत आहेत. औषधांसोबतच आहार आणि जीवनशैलीतील बदल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. रातराणीच्या फुलाचा सुगंध प्रत्येकाचे मन ताजेतवाने करतो, ही वनस्पती पाहण्यास आणि सुगंध घेण्यास सर्वांना आवडते. (Blood Sugar Control)

 

रातराणीचे फूल मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल सारखे अनेक गुणधर्म आहेत. हे अनेक नावांनी ओळखले जाते. त्यापैकी चांदणी फूल, पारिजात आणि हरिसिंगार ही प्रमुख नावे आहेत. हे वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेवूयात…

मधुमेहावर फायदेशीर :
आयुर्वेदानुसार रातराणीच्या फुलाचा रस मधुमेह बरा करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. वास्तविक रातराणीच्या फुलांचा वापर टाइप 2 मधुमेह बरा करण्यासाठी केला जातो. आयुर्वेदाचार्यांच्या मते रातराणीची फुले शरीरातील रक्तातील साखर कमी करण्यासाठी गुणकारी असतात.

 

असा करा वापरा :
रातराणी वनस्पतीची सुमारे 20-25 पाने आणि फुले तोडून घ्या. त्याची फुले दिवस मावळताच जमिनीवर पडतात.
पाने आणि फुले एक ग्लास पाण्यात टाका आणि चांगले उकळा. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा.
त्यानंतर त्याचे तीन भाग करून सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी समान प्रमाणात सेवन करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

 

हे पदार्थ टाळा :
मधुमेहाच्या रुग्णांनी शुगरचे ड्रिंक्स, गोड पदार्थ, जंक फूड, बटाटे, रताळे, आंबा, द्राक्षे, खजूर, केळी,
बीटरूट आणि गाजर इत्यादींचे सेवन करू नये. कारण त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते.

 

Web Title :- Blood Sugar Control | diabetes patient night jasmine flower can be effective in controlling blood sugar know the right way to use it AS

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात विवाहीतेच्या आत्महत्या प्रकरणात सॉफ्टवेअर इंजीनियर पतीसह 5 जणांवर FIR

 

Blood Sugar Control | ‘ही’ 7 लक्षणे दिसताच व्हा सावध, जाणून घ्या अचानक कमी झाली ब्लड शुगर तर काय करावे

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला!, गेल्या 24 तासात 46, 406 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी