महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त होताच अजय देवगणने CM उद्धव ठाकरेंसोबत केले ‘हे’ बोलणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजय देवगनचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर अन्य राज्यामध्ये देखील तान्हाजी करमुक्त करण्यात आलेला आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सैफ अली खान आणि काजोल देखील आहेत. महाराष्ट्रात देखील चित्रपट करमुक्त झाल्यामुळे अजय देवगणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

अजय देवगणने याबाबत ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, तान्हाजी, द अनसंग वॉरिअरला महाराष्ट्रात करमुक्त केल्याबद्दल उद्धव ठाकरेजी तुमचे आभार.

महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत तान्हाजी चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातून काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी तान्हाजी चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तान्हाजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आता पर्यंत तानाजीने दोनशे कोटींचा गल्ला पार केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –