वयाच्या 67 व्या वर्षी अनूप जलोटा यांनी बांधला ‘सेहरा’, जसलीन मथारू दिसली वधूच्या रूपात, फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   भजन सम्राट अनूप जलोटा गेल्या काही वर्षात भजना व्यतिरिक्त सतत चर्चेत आहे. वयाच्या 67 व्या वर्षी, त्याने पुन्हा एकदा असे काहीतरी केले की त्यांची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांची छायाचित्रे पाहून लोक हैराण झाले आहेत. वास्तविक सोशल मीडियावर एक चित्र जोरदार व्हायरल होत आहे, त्यात अनुप जलोटाने शेरवानी आणि डोक्यावर सेहरा घातला आहे, वयाच्या 67 व्या वर्षी नवरदेव झाल्यावर अनूप जलोटा आनंदी दिसत आहे आणि सोबत वधू म्ह्णून मॉडेल-अभिनेत्री जसलीन मथारू दिसत आहे. दोघांची ही छायाचित्रे पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत आणि प्रश्न विचारत आहेत की या दोघांचे लग्न झाले आहेत का?

जसलीन मथारूने ही छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत परंतु लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या चित्रांसह तिने कोणतेही कॅप्शन दिले नाही. तिने फक्त दोन फायर इमोजी लावले आहेत. दरम्यान, लवकरच दोघे एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, ज्याचे नाव आहे ‘वो मेरी स्टूडेंट है’ जसलीनने चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे, यात ती अनूप जलोटासोबत दिसली आहे. हा फोटो शेअर करत जसलीनने कॅप्शनमध्ये लिहिले की, हाय, शेवटी काम सुरू झाले. माझ्या आगामी ‘वो मेरी स्टूडेंट है’ या चित्रपटाचे शूटिंग.

अनूप जलोटाने तीन लग्ने केली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव सोनाली सेठ, दुसरे नाव बीना भाटिया आणि तिसरे नाव मेधा गुजराल आहे. मात्र तिघींसोबत त्यांचे संबंध ठिकू शकले नाहीत. यानंतर त्यांनी इस्त्रायली मॉडेल रीना गोलनलाही डेट केले. सोशल मीडियावर ही चित्रे पाहिल्यानंतर वापरकर्ते जोरदार कमेंट करीत आहेत. युजर्स विचारत आहेत हे केव्हा घडले, बरेच वापरकर्ते फनी कमेंट करीत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले – हमको नहीं मिल रहा दाना और दादा जी खा रहे हैं अनार दाना.

दरम्यान, बिग बॉस सीझन 12 च्या घरात भजन सम्राट अनूप जलोटा आणि जसलीन मथारूची जोडी खूपच जमली होती. त्यावेळी या दोघांबद्दल बर्‍याच प्रकारच्या बातम्याही समोर आल्या. दोघेही पार्टनर म्हणून शोमध्ये आले होते आणि त्यांची लव्ह स्टोरी चर्चेत होती. मात्र, नंतर अनूप जलोटा घराबाहेर पडला होता आणि या नात्यावर स्पष्टीकरण देत म्हणाले की, त्यांच्यात फक्त गुरु शिष्याचे नाते आहे.