समलैंगिक विवाहाच्या विषयावर बोलून अडचणीत आला आयुष्मान खुराना, ट्विटरद्वारे मागतली माफी

पोलीसनामा ऑनलाइन – आयुष्मान खुराना बर्‍याचदा चित्रपटांच्या अत्यंत वेगळ्या संकल्पनेसाठी ओळखला जातो. आयुष्मान लवकरच त्याच्या आगामी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात दिसणार आहे. आजकाल आयुष्मान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मग्न आहे. पण या चित्रपटाच्या चक्करमध्ये आयुष्मानने असे काही सांगितले की आता त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली आहे. खरं तर, अलीकडेच आयुष्मानने एका निवेदनात म्हटलं होतं की, ‘भारतात समलिंगी विवाह कायदेशीर आहे.’ या विधानाने आयुष्मानच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले.

2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधांना फौजदारी गुन्हाच्या श्रेणीतून वगळले. पण याचा अर्थ असा नाही की समलैंगिक विवाह भारतात कायदेशीर म्हणून मान्य केले आहे, असे आयुष्मान याने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आयुष्मानच्या या विधानानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना आयुष्मान म्हणाला की, आम्हाला अभिमान आहे की आम्ही एका समुदायाला पाठिंबा देत आहोत. आपला देश इतका प्रगतीशील आहे की आम्ही समलैंगिक विवाहाला कायदेशीर केले आहे.

या वक्तव्यानंतर आयुष्मानला त्याची चूक लगेच लक्षात आली आणि त्याने केलेल्या चुकीबद्दल त्वरित माफी मागितली. आयुष्मानने ट्विटरवर दिलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याने लिहिले, ‘माझी चूक झाली आहे, मला आशा आहे की भारतात समलिंगी विवाहांना कायदेशीर केले जावे.’

चित्रपट ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ मध्ये आयुष्मान खुराना एक समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारत आहे. जो आपल्या बॉयफ्रेंडच्या परिवाराला त्यांच्या नात्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न करित असतो. या चित्रपटामध्ये जीतेंद्र कुमार ही दिसणार आहे. आयुष्मानचा सुपरहिट चित्रपट ‘बधाई हो’ चित्रपटातील त्याच्या आई-वडिलांची भूमिका साकारणारे गजराज राव आणि नीना गुप्ता ही चित्रपटात दिसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा