स्वरा भास्करनं भाजपच्या ‘या’ महिला खासदारावर साधला ‘निशाणा’, म्हणाली – ‘त्यांना संसदेत पाठवणं देशद्रोह नाही का ?’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार स्वरा भास्कर हिनं मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भोपाळमधील खासदार प्रज्ञा ठाकूर यांचं नाव घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दहतवादाच्या आरोपीला संसदेत पाठवणं देशाविरोधी मानलं जात नाही. परंतु प्रश्न विचारणं देशाविरोधी मानलं जातं.

मध्य प्रदेशात सरकार व महिला बालविकास विभागाकडून शुक्रवारी बिटीया उत्सव सेमीनारचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना स्वरा भास्कर म्हणाली, “दहशतवादाच्या आरोपीला खासदार बनवून संसदेत पाठवणं देशद्रोह नाही. परंतु जे लोक प्रश्न विचारतात ते देशद्रोही आहेत.”

पुढे बोलताना स्वरा म्हणाली, “मला मतादानाचा हक्क आहे. एका चांगल्या नागरिकाप्रमाणे मी टॅक्सही भरते. परंतु जेव्हा मी प्रश्न विचारते तेव्हा देशद्राहाचा खटला दाखल केला जातो. माझंही देशावर तेवढंच प्रेम आहे जेवढं एका राष्ट्रवादी नागरिकाचं असतं.”

स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून सतत सरकारबद्दल स्पष्टपणे बोलत आहे. ती नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल आणि सरकारच्या निर्णयांवर सवाल उपस्थित करताना दिसत आहे. स्वरा भास्करनं शाहिन बागमध्ये सुरू असलेल्या सीएए विरोधातील आंदोलनातही भाग घेतला होता.