Bollywood Drugs Case : धर्मा प्रॉडक्शनचे Ex प्रोड्युसर क्षितिज रवी प्रसादला 2 महिन्यांनंतर जामीन मंजूर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर या ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) अनेक बड्या कलाकारांची चौकशी केली आणि दोषींना अटकही केली. याच प्रकरणात अटक झालेला धर्मा प्रॉडक्शनचे माजी प्रोड्युसर क्षितिज रवी प्रसाद (Kshitij Raviprasad) ला जवळपास 2 महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे. 26 सप्टेंबर रोजी चौकशीनंतर एनसीबीनं त्यांना अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्षितिजच्या घरावर केलेल्या छापेमारीत गांजा सांपडला होता.

क्षितिजला मुंबईच्या स्पेशल एनडीपीएस कोर्टानं (NDPS COURT) 50 हजारांच्या पर्सनल बाँडवर जामीन दिला आहे. यावेळी त्याच्यावर काही निर्बंध घालण्यात आले. त्याचा पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार आहे. तो देश सोडून बाहेर नाही जाऊ शकत. जर काही आवश्यक असेल तरच न्यायालयाच्या परवानगीनंतर त्याला परदेशी जाता येईल. इतकंच नाही तर मुंबईच्या बाहेर जाताना त्याला एनसीबी अधिकाऱ्यांना सूचना द्यावी लागणार आहे.

You might also like