सुशांतची आठवण काढत भावूक झाला क्रिकेटर सुरेश रैना, म्हणाला – ‘सत्य समोर येणार’

पोलिसनामा : सुशांतसिंग राजपूतच्या निधनाचा आज देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. सर्वत्र फक्त सुशांत प्रकरणाबद्दल बोलल जात आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या खरोखर आश्चर्यचकित करतात. त्याच्या मृत्यूमुळे केवळ त्याचे कुटुंब किंवा चाहतेच नव्हे तर संपूर्ण देश या धक्क्यातून सावरू शकला नाही. लोक सोशल मीडियावर सुशांतशी संबंधित आठवणी शेअर करताना दिसतात. फॅमिलीशिवाय सेलेब्रिटीसुद्धा सुशांतसोबत फोटोंच्या माध्यमातून जुन्या आठवणी शेअर करत आहेत. दरम्यान, क्रिकेटपटू सुरेश रैनानेही सुशांतसोबत आपले फोटो शेयर करुन त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने वायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुरेश रैना नुकताच निवृत्त झाला आहे. सुरेश रैनाने सुशांतसोबत आपले फोटो शेअर करताना लिहिले की, ‘अजूनही दु:ख आहे भाऊ पण सत्य बाहेर येईल’. याचबरोबर सुरेशने हॅशटॅग जस्टिस फोर सुशांत सिंह राजपूत लिहिला. सुरेश रैनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच पसंत केले जात आहे. त्याचबरोबर रैनाने सुशांत सिंह राजपूतसाठी अशा प्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी केलेली पोस्ट अभिनेत्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. सुशांत आणि रैनाचे चाहते या पोस्टवर सतत कमेंट करत आहेत.

फोटोत पाहु शकता की सुशांतसिंग राजपूतचे केस लांब दिसत आहेत. तसेच त्याने रेड कॅपही घातली आहे. आणि त्या दोघांच्याही चेहर्‍यावर एक गोड स्माइल ही दिसत आहे. सुशांतचा हा लूक त्याच्या ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या दरम्यानचा दिसत आहे. या चित्रपटात त्याने क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ धोनीच्या जीवनावर बनला होता.