टायगर श्रॉफची बहीण कृष्णासाठी मेकअप आर्टिस्ट बनली दिशा पाटनी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)ची मुलगी आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडील आणि भाऊ अ‍ॅक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अ‍ॅक्टिव आणि चर्चेत असते. अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) आणि कृष्णा यांच्यात किती बाँडिंग आहे हेही सर्वांना माहीत आहे. अनेकदा दोघी एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच दिशा आता आपल्या प्रिय मैत्रीण कृष्णासाठी मेकअप आर्टिस्ट बनली. याची माहिती कृष्णानं दिली आहे.

कृष्णानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमधून तिनं सांगितलं आहे की, तिचा मेकअप हा दिशा पाटनीनं केला आहे. या फोटोत कृष्णा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. कृष्णाचा हा फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे.

चाहत्यांसोबतच दिशा पाटनीनंदेखील यावर कमेंट केली आहे. दिशा म्हणाली, ब्यूटी. दिशाच्या या कमेंटला उत्तर देताना कृष्णानं लिहिलं की, यासाठी तुझे आभार. इतरही चाहत्यांनी कमेंट करत तिच्या सौदर्याचं कौतुक केलं आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : याेर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे. याशिवाय ती एकता कपूरच्या केटीना या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

You might also like