‘स्क्रीन रायटर’ जिशान कादरी विरोधात FIR ! 1.5 कोटी रुपयांच्या अफरातफरीचं प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील स्क्रीन रायटर जिशान कादरी (Zeishan Quadri) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जिशान विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात कलम 420 अंतर्गत फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची कंपनी फ्रायडे टू फ्रायडे एंटरटेन्मेंटवर 1.5 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.

याबद्दल माहिती देताना प्रोड्युसर जतिन सेठी (Jatin Sethi) नं सांगितलं की, त्याची प्रॉडक्शन कंपनी नाद फिल्म प्रॉडक्शन हाऊस आणि जिशान कादरीच्या कंपनीमध्ये या पैशांची डील एका वेब सीरिजसाठी झाली होती. परंतु जिशाननं हा पैसा त्या वेब सीरिजमध्ये गुंतवलाच नाही.

प्रोड्युसर जतिन सेठीनं सांगितल्यानुसार, जिशान कादरीच्या कंपनीत प्रियंका बसी (Priyanka Bassi) देखील सामील आहे. परंतु अद्याप तरी एफआयआरमध्ये जिशान कादरीचं नाव समाविष्ट आहे. प्रियंका बसू हिनं अ‍ॅक्टिंगही केली आहे. परंतु आता ती डायरेक्शन आणि प्रॉडक्शनमध्ये जिशानची साथीदार आहे.

जिशानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं गँग ऑफ वासेपूर, छलांग अशा सिनेमांसाठी स्क्रीन रायटिंग केली आहे.

You might also like