रोमँटीक फोटो शेअर करत गौहर खाननं सांगितली लग्नाची तारीख ! ‘या’ दिवशी बनणार जैद दरबारची ‘दुल्हन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार आणि बिग बॉस 7 ची विनर गौहर खान (Gauahar Khan) अलीकडेच बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये सीनियर म्हणून दिसली होती. सध्या ती तिच्या खासगी लाईफमुळं चर्चेत आली आहे. गौहर खाननं म्युझिक कंपोजर इस्माइल दरबार (Ismail Darbar) चा मुलगा जैद दरबार (Zaid Darbar) सोबत आपलं नातं पब्लिक केलं आहे. लवकरच ती जैद सोबत लग्न करणार आहे. अलीकडेट गौहरनं तिच्या एंगेजमेंट रिगंचा फोटो सोशलवर शेअर केला होता. एक फोटो शेअर करत तिनं लग्नाच्या डेटबद्दल सांगितलं आहे. तिनं लग्नाच्या तयारीला देखील सुरुवात केली आहे. जैद सोबतचा रोमँटीक फोटो शेअर करत तिनं सांगितलं आहे की, ती कोणत्या दिवशी निकाह करणार आहे.

गौहरनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती जैद सोबत दिसत आहे. कॅप्शनमधून तिनं लग्नाची डेट सांगितली आहे. तिंन लिहिलंय की, ती 25 डिसेंबर रोजी लग्न करणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कपलनं लग्नासाठी आयटीसी मराठाची निवड केली आहे. याशिवाय ते पुण्यातील जाधवगड हॉटेलात प्रीवेडींग शुटही करू शकतात. गौहरला तिच्या लग्नला रॉयल टच द्यायचा आहे. 25 ला लग्न आहे परंतु 22 डिसेंबर पासून लग्नाचे प्रीवेडींग फंक्शन्स सुरू होणार आहेत. यानंतर 25 तारखेला निकाह आहे.