गणेश आचार्यविरोधात FIR, ज्युनियर कोरियोग्राफरला जबरदस्तीनं ‘पॉर्न’ दाखवल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य विरोधात मुबईतील अंबोली पोलीस स्टेशनमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका महिला कोरियोग्राफरनं पोलिसांना लेखी तक्रार दिली होती की, गणेश आचार्यनं तिला जबरदस्तीनं पॉर्न दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आयपीसीमधील कलम U/S 354, 354(d), 509, 323, 504, 506, (34) नुसार आचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेनं गणेश आचार्यसोबत काम केलं आहे.

महिला कोरियोग्राफरनं आरोप करत म्हटलं होतं की, गणेश आचार्य तिला जबरदस्तीनं पॉर्न व्हिडीओ पाहण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या 33 वर्षीय महिला कोरियोग्राफरनं इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरियोग्राफर असोसिएशनचे महासचिव गणेश आचार्य यांच्याविरोधात राज्यातील महिला आयोग आणि अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिचा आरोप आहे की, तिला इंडस्ट्रीत काम मिळू नये यासाठी गणेशा आचार्य प्रयत्न करत होते. ते कमाच्या बदल्यात पैसेही मागायचे आणि अ‍ॅडल्ट व्हिडीओ पाहण्यासाठी प्रवृत्त करायचे.