सोशल मिडीयावर करण जोहर परतला, सुशांतच्या मृत्यूनंतर 2 महिन्यानी केली ‘ही’ पोस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा नामवंत दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचं सोशल मीडियावर पुनरागमन झालं आहे. करणने स्वातंत्र्यता दिवसाच्या संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची शेवटची पोस्ट त्याने 14 जूनला टाकली होती. करणने सुशांतचा आणि त्याचा फोटो शेअर करत सुशांतच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. करण जोहरने इंस्टाग्रामवर लिहिलं आहे की, “आपल्या महान देशासाठी संस्कृती आणि इतिहास म्हणजे संपत्ती आहे….हैप्पी इंडिपेंडेन्स डे.. जय हिंद।” सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 या दिवशी बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूड मध्ये घराणेशाहीवरून मोठ्या प्रमाणात वाद चालू झाला होता. या वादात अनेकजण अडकले होते.

https://twitter.com/karanjohar/status/1272111382905802753

ट्विटरवर केला होता मोठा बदल
करण जोहरला अनेकांनी ट्रोल केलं होतं, त्यामुळे त्याने फक्त 8 लोकांना सोडून सगळ्यांना अनफॉलो केलं होतं. या 8 जणांमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अपूर्वा मेहता आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या ट्विटर हँडलचा समावेश होता.

सुशांतच्या मृत्यूनंतर व्यक्त केलं होतं दुःख
सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर करण जोहरने एक एक पोस्ट शेअर केली होती. करणने पहिलं ट्विट 14 जूनला केलं होतं. या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं होतं, ‘ही दुःखद घटना आहे, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवतोय, मला विश्वासच बसत नाही, भावपूर्ण श्रद्धांजली।’ यानंतर करणने इंस्टाग्रामवर दुसरी पोस्ट शेअर केली. यामध्ये सुशांत सोबतचा फोटो शेअर केला होता. “तुझ्याशी संपर्कात राहिलो नाही म्हणून मी स्वतःला दोष देतोय, मला असं वाटतं कि तुला अशा लोकांची गरज होती ज्यांना तू तुझ्या मनातलं सगळं सांगशील, पण मी या गोष्टीला समजू शकलो नाही, ही चूक मी पुन्हा करणार नाही. आम्हाला फक्त नाती जोडायचीच नाहीत तर ती टिकवायची देखील आहेत. तुझं ते निखळ हसू आणि ती गळाभेट नेहमी आठवत राहील.”