ALT ‘बालाजी’चा ‘मेंटलहुड’चा टीझर झाला रिलीज, करिष्मा कपूरनं दिला आश्चर्याचा धक्काच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका आईच्या जीवनात दररोजचा दिवस अनेक अडचणींचा असतो, यासाठी तिला काही वेडेपणाही करावा लागतो, आणि तिच सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी काळजी घेते, याचीच एक झलक प्रसिद्ध करत एएलटी बालाजी आणि जी5 ने आपली सर्वात बहुप्रतिक्षित वेब-सीरीज मेंटलहुडचा टीझर रिलीज केला आहे. ओटीटी मंचावर एकाच वेळी अनेक प्रतिभावंताना सादर करत, यामध्ये बॉलीवुडची लोलो म्हणजे करिष्मा कपूर सुद्धा आपला डिजिटल डेब्यू करत आहे, वेब-सीरीज मेंटलहुडचा टीझर रिलीज झाला आहे आणि प्रत्यक्षात हा एक रोलरकोस्टर राईडसारखा आहे, जो आपण चुकवू शकत नाही.

 

ही सीरीज मार्चपासून ऑल्ट बालाजी आणि जी 5 वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल, परंतु त्यापूर्वी शोचा एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. करिष्मा कपूर या वेब सीरीजमध्ये मीरा शर्मा, मिस कानपुर आणि तीन छोट्या मुलांच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. शोच्या टीझरमध्ये करिश्माला मेंटल मॉम मीराच्या रूपात सादर करण्यात आले आहे. डिनोला स्टे-अ‍ॅट-होम डॅड आकाश फर्नांडिस, संध्या मोम्जिला अनुजा जोशी, शिल्पाला वर्कहॉलिक मॉम नम्रता डालमिया, श्रुतिला बोहो मॉम दीक्षा शाह आणि तिलोत्तमाला पुशओवर मॉम प्रीति खोसला च्या रूपात सादर करण्यात आले आहे.

करिष्मा कोहली द्वारे दिग्दर्शित मेंटलहुडमध्ये करिष्मा कपूर एक मेंटल माता मीरा शर्माच्या रूपात आपला डिजिटल डेब्यू करत आहे. यापूर्वीच्या पोस्टरवरून आपल्याला अंदाज येतो की, ही एक मनोरंज वेब सिरिज असणार आहे. टीझरने ते दाखवून दिले आहे. या आगामी वेब-सीरीजमध्ये विविध प्रकारच्या मातांचा प्रवास दाखवण्यात आला आहे, ज्या आपल्या मुलांचे संगापन करण्यासाठी विविण युक्ती अजमावतात. मल्टी-टास्किंग त्यांची एक सवय होऊन जाते. सतत चिंता आणि गिल्ट फीलिंग त्यांच्या स्वभावाचा भाग बनून जातात.

शोचे निर्माता 24 फेब्रुवारी 2020 ला ट्रॅलर लाँच इव्हेंट आयोजित करण्यासाठी तयार आहेत. जो भव्य असणार आहे. हा बहुप्रतीक्षित शो मार्चमध्ये ऑल्ट बालाजी आणि जी5 वर उपलब्ध असणार आहे.