‘महाभारत’मध्ये रूपा गांगुलीनं साकारली होती ‘द्रौपदी’व्यतिरीक्त आणखी एक भूमिका ! तुम्ही नोटीस केलंत का ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : महाभारतातील भीष्म पितामह, दुर्योधन, कर्ण, शकुनी मामा सोबतच असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांच्या मनात खास जागा तयार केली आहे. यापैकीच एक आहे. रूपा गांगुली. रुपा गांगुली हिनं द्रौपदीची भूमिका साकारली होती. यासाठी तिनं खूप मेहनत घेतली होती. रूपानं मालिकेतील काही आठवणी शेअर केल्या आहेत.

रूपा सांगते, “माझी हिंदी कमजोर असल्यानं मी माझ्या भूमिकेच्या तयारीसाठी सर्वात आधी सेटवर पोहोचत असे. 7 वाजताच्या कॉलटाईमसाठी मी दोन तास आधी 5 वाजताच जायचे.” रूपानं महाभारतमधील तिच्यावर शुट केलेलं एक गाणंही गायलं आहे. गाण्याचा अनुभव कमाल असं ती सांगते. आपला अनुभव सांगताना रूपा म्हणते, “रवीजींनी मला गाण्यासाठी विचारलं. मला माहित होतं मी गाणं गाईन. कारण मी लहानपणी गायचे.

मी रवीजींना सांगितलं होतं की, जर तुम्हाला गाणं आवडलं नाही तर तुम्ही एखाद्या सिंगरकडून गाणं गावून घ्या. परंतु माझा आवाज साऱ्यांना आवडला आणि माझं गाणं ठेवण्यात आलं. नैनों के… असं त्या गाण्याचं नाव होतं. अशा प्रकारे रूपानं महाभारतमध्ये गायकाची आणखी एक भूमिकाही पार पडली होती. परंतु खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे.