Nikhil Dwivedi Corona Positive : ‘स्कॅम 1992’ फेम अभिनेता निखिल द्विवेदीला ‘कोरोना’ची लागण !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अ‍ॅक्टर आणि प्रोड्यूसर निखिल द्विवेदी (Nikhil Dwivedi) याची कोरोना व्हायरस टेस्ट (Covid-19 Test) पॉझिटिव्ह आली आहे. सध्या तो घरीच आयसोलेट झाला आहे. त्याच्या पत्नीचीही कोरोना टेस्ट करण्यात आली आहे जी निगेटिव्ह आली आहे. खुद्द अभिनेत्यानंच याबाबत खुलासा केला आहे.

निखिलनं सांगितलं की, त्यांच्या तोंडाला अजिबात चव नाही. होय माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर त्याचे चाहते आता तो लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

निखिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अलीकडेच तो स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी या वेब सीरिजमध्ये दिसला होता. स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सीरिज स्टॉक मार्केटमधील स्कॅमवर आधारित आहे. याला आयएमडीबीवर 9.6 रेटिंग मिळाली आहे. निखिलनं वीरे दी वेडिंग आणि दबंग 3 असे सिनेमे प्रोड्यूस केले आहेत. विशाल फुरिया डायरेक्टेड आणि निखिल द्विवेदी द्वारा पोड्युस केलेल्या एका 3 सिनेमाच्या शृंखलेत अभिनेत्री श्रद्धा कपूर नागिनच्या लुकमध्ये दिसणार आहे.

You might also like