बायोपिकमध्ये माझा रोल ‘आमिर खान-टॉम क्रूज’नं साकारावा : शाहिद आफ्रिदी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आपल्या विचित्र वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत राहणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यानं पुन्हा एकदा असं काही स्टेटमेंट केलं आहे ज्यामुळं सर्वजण सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवत त्याच्यावर टीका करत आहेत. शाहिदचं म्हणणं आहे की, त्याच्यावर आधारीत सिनेमात त्याची भूमिका आमिर खान किंवा टॉम क्रूजनं साकारावी. शाहिदनं जशी त्याची ही इच्छा बोलून दाखवली लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.

शाहिदला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, त्याच्यावर सिनेमा बनला तर त्याची भूमिका कोणी साकारावी असं त्याला वाटतं. यावर आफ्रिदी लगेच म्हणाला, इंग्रजी बायोपिकमध्ये त्याची भूमिका टॉम क्रूजनं आणि उर्दू व्हर्जनमध्ये आमिर खाननं त्याची भूमिका साकारावी. शाहिदच्या बायोपिकचं ऐकताच सोशल मीडियावर लोक हसायला लागले आणि खिल्ली उडवत त्याला ट्रोल करू लागली.

एकानं म्हटलं की, “पाकिस्तानला दोन वेळा विकलं तरी आमिर खानची अर्धीसुद्ध फी देता येणार नाही.

एका युजरनं तर आयुष्मान खुरानाचा एक डॉयलॉग वापरत मीम्सही बनवलं आहे.

एकानं तर असंही लिहिलं की, सिनेमच्या सुरुवातीचा पहिला सीन असा असेल की, शाहिद आफ्रिदी बॅटींगसाठी मैदानात उतरला आणि झिरोवर आउट झाला. पुन्हा शेवटचा सीन तोच. लगचे सिनेमा समाप्त.” अजूनही अनेक नेटकरी कमेंट करत त्याला ट्रोल करत आहेत.