बॉयफ्रेंड अली फजलसोबत ‘सी फेसिंग’ अपार्टमध्ये शिफ्ट झाली अभिनेत्री ऋचा चड्ढा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढा (Richa Chadda) साठी हे वर्ष खूप आनंदाचं असणार होतं. कारण यावर्षी ती बॉयफ्रेंड अभिनेता अली फजल (Ali Fazal) सोबत लग्न करणार होती. याची पूर्ण तयारी झाली होती. एप्रिलमध्ये हे लग्न होणार होतं. परंतु कोरोनामुळं हे टाळण्यात आलं. आता या कपलनं सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ऋचा आणि अली हे दोघंही त्यांच्या सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत. दोघंही खूप खूश आहेत. ऋचानं तिच्या एका ताज्या मुलाखतीत सांगितलं आहे की, तिला एका अशा घरात शिफ्ट व्हायचं होतं जिथं सतत मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद होण्यापासून ती वाचेल.

मुलाखतीत बोलताना ऋचा म्हणाली, आम्हाला शांती हवी होती. आमचं नवं घर समुद्राच्याजवळ आहे. इतर चहूबाजूला रिटायर्ड लोक राहतात. ही बांद्र्याच्या अंधेरीप्रमाणे फोटोग्राफरकडून घेरली जाणारी जागा नाही. इथं आम्हाला खूप प्रायव्हसी मिळेल. ऋचा आणि अलीचं हे नवीन रेंटवर आहे. काही वर्षे हे कपल इथं राहणार आहे.

ऋचाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती आर्टीकल 375 सिनेमात दिसली होती. याशिवाय तिनं डायरेक्टर अय्यर तिवारी यांचा स्पोर्ट ड्रामा सिनेमा पंगामध्येही काम केलं आहे.

अलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्रिया सारन हिचा हिंदी आणि इंग्रजीत आलेल्या (The Other End of the Line) या सिनेमात पहिल्यांदा काम केलं होतं. 2008 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. 2011 साली तो ऑलवेज कभी कभी सिनेमात लिड रोलमध्ये दिसला होता. 2013 मध्ये आलेल्या फुकरे सिनेमातून त्याला ओळख मिळाली. मिर्झापूर या वेब सीरिजच्या दोन्ही सीजनमध्ये काम केल्यानंतर आता त्याची लोकप्रियत गगनाला भिडली आहे. त्याची गुड्डू पंडित अर्थात गुड्डू भैया ही भूमिका खूप गाजली आहे.

You might also like