‘तैमूरला रामायण पहायला आवडते, तो स्वतःला भगवान श्रीराम समजतो’, सैफ अली खाननं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान बर्‍याचदा चर्चेत असतो. त्याच्या या क्यूट स्टाईलला लोकांनी पसंती दिली आहे आणि म्हणूनच इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो बरेच व्हायरल होत असतात. काही वर्षांपूर्वी लोकांना तैमूरच्या प्रत्येक क्रियेविषयी जाणून घ्यायचे होते आणि आताही त्याचे बरीच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर होत राहतात. सैफ आणि करीना हे दोघे तैमूरला फोटोग्राफर्सपासून थोड्या अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

मात्र, आता सैफ अली खानने तैमूरविषयी अशीच एक गोष्ट सांगितली आहे, त्यानंतर तैमूर पुन्हा चर्चेत आला आहे. वास्तविक, सैफ अली खानने सांगितले आहे की, तैमूरला रामायण पहायला आवडते आणि विशेष म्हणजे तैमूर स्वत: ला भगवान श्री राम समजतो आणि तसाच अ‍ॅक्ट करतो. फार कमी लोकांना माहित असेल की, तैमूरला रामायण पहायला आवडते.

सैफ अली खानने नुकताच रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तैमूरला टीव्ही मालिका रामायण पाहण्याची आवड आहे आणि त्याला (तैमूरला) वाटते की, आपण भगवान राम आहोत. सैफ अली खान म्हणाला की, ‘सध्या तो स्वत: ला भगवान राम मानतो. त्याला रामायण खूप आवडते. राजा आर्थर आणि तलवारी यांच्याविषयी ऐकणे त्याला आवडते. करीना आणि मी त्याच्यासाठी अभ्यास करतो. ‘

सैफ पुढे म्हणाला की, तैमूर नेहमी कोरोना व्हायरस बोलत राहतो आणि सतत मास्क परिधान करत राहतो. तसेच, त्याने सांगितले की, तैमूरला क्रिकेटमध्ये रस नाही आणि तो आपल्या आजोबांसारखाच असेल असे सैफला वाटते. महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक सदस्य तैमूर अली खानच्या घरी येत आहे. वास्तविक, सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी अलीकडेच अभिनेत्री गर्भवती असल्याची घोषणा केली होती.