Coolie No. 1 Trailer : रिलीज होताच इंटरनेटवर गाजतोय ‘कुली नंबर 1’ चा ट्रेलर ! पाहा ‘वरुण-सारा’चा खास अंदाज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार(Bollywood star) वरुण धवन (Varun Dhawan) आणि बॉलिवूड स्टार(Bollywood star) सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या त्यांचा आगामी सिनेमा कुली नंबर 1 (Coolie No. 1) मुळं चर्चेत आहेत. हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डेला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. आज (शनिवार, दि. 28 नोव्हेंबर) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रिलीज होताच सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अलीकडेच वरुणनं त्याच्या इंस्टावरून एक पोस्टर शेअर केलं आहे. हे सिनेमाचं नवीन पोस्टर होतं. यात तो 5 वेगळ्या अवतारात दिसला होता. त्यांच्या सोबत सारा अली खानसुद्धा दिसत होती. सिनेमाचं नवं पोस्ट शेअर करत त्यानं ट्रेलरबद्दल माहिती दिली होती. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं होतं की, राजू येतोय. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि फेसबुक व यूट्यूबवर भेटूयात.

कुली नंबर 1 सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि गोविंदा (Govinda) यांच्या कुली नंबर 1 या सिनेमाचा हा रिमेक आहे. डेविड धवननं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबतच परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लिवर, राजपाल यादवसहित इतर कलाकार दिसणार आहेत. वासू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी याची निर्मिती केली आहे.