इन्स्टाग्राम पुरस्कारांमध्ये ‘देसी गर्ल’ आणि बॉलीवुडच्या ‘मस्तानी’ची बाजी, सारा अली खाननंही पटकावला पुरस्कार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मिडियाचा ट्रेंड खुप चालत आहे. या माध्यमातून सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटी नेहमी अपडेट असतात. ते त्यांचे अविस्मरमीय क्षण, फोटो, त्यांच्या भावना चाहत्यांना शेअर करत असतात. इन्स्टाग्राम हे सेलिब्रिटींचे आवडते अ‍ॅप आहे. त्यांच्या सिनेमांच्या प्रमोशनापासून ते स्वतःचे लहान लहान गोष्टी मिडियावर शेअर करत असतात. नुकताच इन्स्टाग्रामकडून पुरस्कार जाहीर झाले आहेत.

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटीचा पुरस्कार ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला मिळाला आहे. ‘स्टोरीटेलर ऑफ द इअर’चा पुरस्कार दीपिका पादुकोण हिने पटकावला आहे. त्याचबरोबर नुकतेच बॉलिवूडमध्ये पर्दापण केलेल्या अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने यात बाजी मारली आहे. साराला ‘राइसिंग स्टार अ‍ॅवॉर्ड’मिळाला आहे. इन्स्टाग्रामवर प्रियांकाचे ४ कोटीहून अधिक फोलोअर्स आहे. ‘मोस्ट फॉलोअड अकाऊंट’असलेली प्रियांका इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

जीवनातील महत्वपुर्ण गोष्टी शेअर करणारी दीपिका ही इन्स्टा स्टोरी, चॅट या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. ती अनेक फोटो, व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत असते. तिने चाहत्यांचे मनापासून आभार देखील मानले आहे. दीपिकाने पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करत या वर्षी मी आणखी बऱ्याच गोष्टी, घडामोडी मी शेअर करणार असल्याचे सांगितले.

 

https://www.instagram.com/p/BvOVGmOA8_c